गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कर्तव्यभावना व राष्ट्रभक्ती रुजविण्यावर भर द्यावा:शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन हा गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संस्कार, कर्तव्यभावना, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. आई-वडिलानंतर गुरुजनांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान करावा, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री…
