वाघोली येथील भाडळे नगर आय व्ही इस्टेट कडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे सांडपाणी आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सांडपाण्याची दुर्गंधी या परिसरात पसरली असून सांडपाणी साचून राहिल्याने नागरिकांना त्यातूनच ये जा करावी लागत आहे. वाहनधारकांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने या भागात तातडीने तुंबलेल्या ड्रेनेजचे दुरुस्तीचे काम करून या भागातील नागरिकांची सांडपाण्याच्या दुर्गंधीतून सुटका करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
आय व्ही इस्टेट रस्त्यावर ड्रेनेज तुंबल्याने नागरिक त्रस्त
