Headlines

Dainike Sandhya

​पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार – सुनेत्रा पवार

मुंबई दि.१९ ऑगस्ट – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात आपण पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. याप्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट…

Read Full News

दक्ष नागरिक व पोलिसाच्या सतर्कतेमुळे लहान अर्भकाचे प्राण वाचले

तांदूळवाडीत स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ; माणुसकीला काळीमा फासणारी घटना बारामती – याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की 19 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याचे सुमारास पोलिसांना दक्ष नागरिकांनी फोन करून माहिती दिली की,तांदूळवाडी येथील जुन्या रेल्वे ब्रिज खाली एक लहान नवजात अर्भक दिसत आहे व ते रडत असल्याचा आवाज येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून…

Read Full News

अजितदादांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली; चित्रकला व सांस्कृतिक सोहळ्यात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

किरण दादा गुजर यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान; नटराज नाट्य कला मंडळाचा ४० वर्षांचा कलाप्रवास बारामती : बालकलाकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या नटराज नाट्य कला मंडळ, बारामतीच्या वतीने आयोजित चित्रकला व सांस्कृतिक सोहळा यंदा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भावपूर्ण वातावरणात पार पडला. बारामतीच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहिलेले आणि कला क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन देणारे स्व. अजितदादा पवार यांच्या…

Read Full News

राहू येथे विजेच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू ;महिला बचावली

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहू गावात जनावरांच्या गोठ्याबाहेर कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला वीजप्रवाह उतरल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली.या दुर्घटनेत रोहित अनिल भोइटे (वय २०) आणि ओम नितीन भोइटे (वय १८) यांचा मृत्यू झाला असून सोनाली नितीन भोइटे (वय ४०) या जखमी झाल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,…

Read Full News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत

यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो. या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरत असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी…

Read Full News

देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी- अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील

देहदानाला वैद्यकीय शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व असून देहदात्यांच्या योगदानामुळे भावी डॉक्टरांना मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष व सखोल अभ्यास करता येतो. देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ अंजली पाटील यांनी केले. बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात देहदान करणाऱ्या कुटुंबीयांच्या सन्मान…

Read Full News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत

यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो. या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरत असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी…

Read Full News

येरवडा पोलिसांची धडक कारवाई; चोरीच्या विदेशी दारूसह दोघांना अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची कामगिरी; २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त पुणे : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे, चोरीच्या घटना आणि अन्य बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी येरवडा पोलिसांनी विशेष गस्त आणि तपास मोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत…

Read Full News

नवीन समाविष्ट गावांतील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती कामांना गती देण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या सूचना

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि मूलभूत नागरी सुविधांच्या समस्यांची गंभीर दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी संबंधित विभागांना रस्ते व ड्रेनेजची कामे तातडीने हाती घेऊन त्यांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन समाविष्ट गावांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असून काही ठिकाणी रस्ते अपूर्ण आहेत. तसेच ड्रेनेजची…

Read Full News

माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर महादेवास महारुद्राभिषेक

सासवड : सासवड येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या महारुद्राभिषेक व महापूजेचा मान माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप आणि सौ. राजवर्धिनी संजय जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी श्री सिद्धेश्वर महादेवास पितळेची सुवर्ण प्रभावळ अर्पण करण्यात आली. श्रावण उत्सवानिमित्त १६ ऑगस्ट…

Read Full News