लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; पुणे जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्यविषयक कामांना गती द्या– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
पुणे जिल्ह्यातील लोहगाव उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करून उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांवरील कार्यवाहीला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या….
