Headlines

हरवलेले मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन ,खेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.


: राजगुरुनगर खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेले व गहाळ झालेले मोबाईल शोधून खेड पोलिसांनी मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहे. एकूण ९ लाख रुपये किंमतीचे २५ मोबाईल फोन विविध जिल्ह्यांतून शोधून हस्तगत करण्यात खेड पोलिसांना मोठे यश आले आहे. या वेळी मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून आला. नागरिकांनी खेड पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करीत आभार मानले.खेड पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. CEIR पोर्टलच्या मदतीने मोबाईलची माहिती व तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून २५ मोबाईल शोधून ते ताब्यात घेतले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस हवालदार संतोष घोलप, पोलीस अंमलदार महेश गोसावी व सुरज राक्षे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *