मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती



गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या महापौर निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच राष्ट्रीय सह-संगठन महामंत्री शिवप्रकाश यांनीही श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. श्री गणरायाच्या चरणी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासह पुणे शहराच्या प्रगतीसाठी, नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी आणि सर्वांच्या आरोग्य व मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. गणरायाच्या दर्शनाने महापौर निवासस्थानी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
