शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा एका क्लिकवर; नुकसानभरपाई, विम्याची प्रक्रिया होणार सुलभशेअर क्रॉपर्सतर्फे विकसित तीन डिजिटल प्लॅटफॉर्मचे सोमवारी (ता. १९) लोकार्पण; ‘एफपीओ’ना पाच ट्रॅक्टर वितरित होणारशेतजमीन, पीक, खर्च आणि नुकसानीच्या नोंदी एकाच ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांना थेट मदत मिळण्याचा मार्ग होणार जलद
पुणे : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि पात्रतेच्या याद्यांमधील नोंदी यांसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि माहितीवर आधारित करण्यासाठी पुण्यातील शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेडने (एससीपीएल) डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांची जमीन, पिके, पेरणी, उत्पादन, खर्च आणि नुकसानीसंबंधी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध…
