Headlines

मंगेश चिवटे हेच महायुतीकडून प्रबळ उमेदवार

पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिफारस करणार – भाजप आमदार राजेंद्र राऊत

बार्शी – राज्यभरातील गरजू रुग्णांना मदतीचा हात देणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे हेच महायुतीकडून प्रबळ उमेदवार असून त्यांना आगामी पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळावी,यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण ठामपणे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारासाठी आता भाजप आमदारांनी कंबर कसल्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात मंगेश चिवटे पारडे जड समजले जात आहे.

बार्शी येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित आदर्श आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना भाजप आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, “पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांच्या प्रचाराचा झंझावात पाहता तेच महायुतीकडून प्रबळ उमेदवार आहेत.त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी आपण व्यक्तिशः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीमधील सर्व जेष्ठ नेत्यांकडे सकारात्मक भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षकांचे प्रश्न,शैक्षणिक संस्थांच्या अडचणी आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांना विधान परिषदेत प्रभावी व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे.मंगेश चिवटे यांच्यासारखा सातत्याने लोकांमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता शिक्षकांचा आवाज प्रभावीपणे मांडू शकतो,असा विश्वासही आमदार राऊत यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *