पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वास्तूंची जतन-संवर्धन कामे दर्जेदार करावीत – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई’ अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या जतन व संवर्धनाची कामे सुनियोजित, दर्जेदार आणि या वास्तूंच्या ऐतिहासिक महत्त्वाला साजेशी व्हावीत, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या विशेष निधीच्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे…
