महावितरणच्या कारभारावर ग्राहकांचा संताप ; वीजबिल दुरुस्तीसाठी वारंवार हेलपाटे
महावितरणच्या आळंदी विभागातील कारभाराविरोधात वीजग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वीजबिलांमधील त्रुटी, वाढीव बिले आणि तक्रारींच्या निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या वारंवार फेऱ्या यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड.सौरभ गव्हाणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत कारभारात सुधारणा करण्याची मागणी केली. वीजबिल दुरुस्तीसाठी सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यातील केवळ दोन दिवसच अधिकारी उपलब्ध…
