Headlines

दादर येथील चैत्यभूमी ते इंदूमिलपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

दादर येथील चैत्यभूमीपासून इंदूमिलपर्यंत जाणाऱ्या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. रस्त्याच्या जागेच्या हस्तांतरण प्रक्रियेसाठी महसूल विभाग तसेच एमएमआरडीएचे अभिप्राय तत्काळ मिळविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाठपुरावा करावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मुख्य स्तूप या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र…

Read Full News

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

शेतात मशागत करताना काळाचा घाला; परिसरात हळहळ उरुळी कांचन प्रतिनिधी : वळती (ता. हवेली) येथे शेतात मशागत करत असताना ट्रॅक्टर तालीवरून पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार,( ता. ४ सप्टेंबर) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. सोपान केरू कुंजीर (वय ५६, रा. वरचा मळा, वळती, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत…

Read Full News

आय व्ही इस्टेट रस्त्यावर ड्रेनेज तुंबल्याने नागरिक त्रस्त

वाघोली येथील भाडळे नगर आय व्ही इस्टेट कडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे सांडपाणी आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सांडपाण्याची दुर्गंधी या परिसरात पसरली असून सांडपाणी साचून राहिल्याने नागरिकांना त्यातूनच ये जा करावी लागत आहे. वाहनधारकांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने या भागात तातडीने तुंबलेल्या ड्रेनेजचे…

Read Full News

सामाजिक रक्षाबंधनातून ‘आपण सारे एक’चा संदेश

पुणे : रक्षाबंधनाचा धागा हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता, समाजातील विविध घटकांना परस्परांच्या विश्वासाच्या आणि आपुलकीच्या नात्यात जोडणारा ठरावा, या उद्देशाने महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकारातून महापौर निवासस्थानी ‘एक राखी, एक राष्ट्र, एक समाज’ या संकल्पनेवर आधारित सामाजिक रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा पार पडला. विविध जाती-पंथांतील नागरिकांसह तृतीयपंथीयांनीही या उपक्रमात सहभागी होत सामाजिक समरसतेचा…

Read Full News

उपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा

हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन व मेट्रोच्या कामांना कालबद्ध गती द्या-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. परिसराच्या भविष्यातील गरजा लक्षात…

Read Full News

स्क्रॅप मटेरियलपासून एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारली ‘गरुडा’ इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर

वनगळी (इंदापूर) येथील एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्क्रॅप मटेरियलचा प्रभावी वापर करून ‘गरुडा’ ही बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर यशस्वीरित्या विकसित केली आहे.पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली ही इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे ६० किलोमीटर अंतर पार करू शकते. गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी…

Read Full News

दौंड नानगाव येथे सहा वर्षाच्या चिमुकली वरती लैंगिक अत्याचार अत्याचार करून नराधमाने विहिरीत फेकले

दौंड तालुका नानगाव येथील अल्पवयीन सहा वर्षाच्या चिमुकली वरती लैंगिक अत्याचार करू तिला जीवे मारून तीला विहिरीमध्ये फेकून दिले नांदगाव येथील ऊस गुराळावरती ऊसतोड कामगारांमध्ये आई वडील घरी नसल्याचा फायदा घेऊन टोळी कामगाराच्या मुलाने लैंगिक अत्याचार करून तिला जीव मारून पुरावा नष्ट करण्याचे काम केले असल्याची घटना नांनगावमध्ये घडली आहे या घटनेने दौंड तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये…

Read Full News

बारामतीत रहदारीस अडथळा ठरणाऱ्या १९ कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई

शहरातील प्याजो कंपनीसमोरील रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कंटेनर वाहने उभी करण्यात आल्याप्रकरणी प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १९ कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्याजो कंपनीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी…

Read Full News

नागरिककेंद्रित विकासातून शाश्वत विकासाला गती द्या -मुख्य सचिव राजेश अग्रवाल

‘शाश्वत विकास उद्दिष्टे’ दोन दिवसीय कार्यशाळाचा समारोप पुणे, दि. ३१ : शाश्वत विकास उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांच्या मूलभूत गरजा केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाने अधिक गतिमान, समन्वयपूर्ण आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे. उपलब्ध निधी, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा योग्य वापर करून शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज आणि कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश…

Read Full News

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी आज, दि. ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी…

Read Full News