पुण्यातील स्टार्टअपचा कान्समध्ये (फ्रान्स) गौरव
वृद्धांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादने डिझाइन करणाऱ्या पुण्यातील ‘हाऊस ऑफ टुमारो’ या स्टार्टअपला ‘इनलू’ या उत्पादनाच्या डिझाइनसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. ‘इनलू’ ही कोणत्याही व्यक्तीला आरामात वापरता येईल अशा प्रकारे तयार करण्यात आलेली टॉयलेट अटॅचमेंट आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना टॉयलेटमध्ये बसणे आणि उठणे सोपे होते तसेच त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनाही मदत होते. वृद्धांच्या गरजेनुसार…
