राहू येथे विजेच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू ;महिला बचावली
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहू गावात जनावरांच्या गोठ्याबाहेर कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला वीजप्रवाह उतरल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली.या दुर्घटनेत रोहित अनिल भोइटे (वय २०) आणि ओम नितीन भोइटे (वय १८) यांचा मृत्यू झाला असून सोनाली नितीन भोइटे (वय ४०) या जखमी झाल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,…
