कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड; चार आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी!
पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी असल्याची गोपनीय माहिती;चार धारदार कोयते व एक तलवार जप्त — अटक केलेल्या चार आरोपींविरुद्ध दरोडा,खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी,खंडणी व मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यांची पूर्व नोंद! बारामती – कुस्तीच्या तालमीत लाल मातीचा आखाडा असतो; मात्र बारामती शहरातील शिवाजीनगर,कसबा परिसरातील एका कुस्तीच्या तालमीमध्ये याच लाल मातीखाली लपवून ठेवलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस…
