सुपे घाटात एसटी बस कोसळली,विद्यार्थी किरकोळ जखमी; युगेंद्र पवार घटनास्थळी दाखल
बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस सुपे घाटात दरीत कोसळून झालेल्या अपघाताची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चौफुल्याकडून सुप्याकडे जात असताना बसचा सुपे घाटातील चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
